केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

By मुकेश चव्हाण | Published: October 16, 2020 11:17 PM2020-10-16T23:17:46+5:302020-10-16T23:19:00+5:30

Maharashtra Flood, Narendra Modi, Uddhav Thackeray News: बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

The central government will cooperate over flood;PM Narendra Modi assurance to CM Uddhav Thackeray | केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

केंद्र सरकार सहकार्य करेल; पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वासन

Next

मुंबई: परतीच्या पावसानं राज्याला दिलेल्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारकडे मदतीची विनवणी करत आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरुन संपर्क साधून महाराष्ट्राला मदतीचे आश्वासन दिले आहे. यासंबंधित माहिती खुद्द नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करत दिली आहे.

नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.

भातपिकाचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातपिकाची अक्षरश: नासधूस केली आहे. ५५ हजार हेक्टर पैकी तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर केले आहे. तर बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले.

Web Title: The central government will cooperate over flood;PM Narendra Modi assurance to CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.