शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

एक बाकी एकाकी...कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्नी-मुलाचाही पाठिंबा नाही; काँग्रेसची रणनीती यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 09:02 IST

काँग्रेस आमदारांचा अमरिंदर सिंग यांना पाठिंबा नाही, पत्नी आणि मुलाचाही पक्ष सोडण्यास नकार

ठळक मुद्देकाँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करणाऱ्या कॅप्टननी आपल्यासोबत काँग्रेसचे बरेच आमदार आहेतकॅप्टन अमरिंदर यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर दावाकॅप्टन पंजाब विकास पार्टी स्थापन करतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपद गेल्याने पक्ष सोडण्याची धमकी देणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापासून दूर राहण्याचे काँग्रेसच्या ७७पैकी बहुसंख्य आमदारांनी ठरविले असल्याचे दिसत आहे. ते पक्ष सोडण्यास तयार नाहीत. इतकेच काय, पण कॅप्टनच्या पत्नी व पतियाळाच्या काँग्रेस खासदार प्रणित कौर आणि मुलगा रानिंदर सिंग हेही काँग्रेसमधून बाहेर पडायला तयार नाहीत.

काँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करणाऱ्या कॅप्टननी आपल्यासोबत काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी सांगितले. पण ते गुरुवारी चंदीगडला परतले, तेव्हा त्यांच्या स्वागताला हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच आमदार होते. कॅप्टन पंजाब विकास पार्टी स्थापन करतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण आपण कॅप्टनबरोबर गेल्यास फेब्रुवारीतील विधानसभा निवडणुकीत आपण पराभूत होऊ, अशी भीती काँग्रेस आमदारांना वाटत आहे. त्यामुळे ते बाहेर पडायला तयार नाहीत. 

सर्वांनाच आहे माहीतकॅप्टन बाहेर पडण्याची घोषणा करीत असले तरी त्यांच्यामागे आमदार नाहीत, हे सर्वांना लक्षात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भाजप व अकाली दल हेही करायला तयार नाहीत. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाब