शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

Video: खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंचे मोठं विधान; सर्व समाजाचे आरक्षण रद्द करा अन्...

By प्रविण मरगळे | Published: September 27, 2020 4:44 PM

ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

सातारा – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा समाजात संतप्त भावना निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोर्टात बाजू मांडण्यासाठी कमी पडले असा आरोप होत आहे. तर मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनाला सुरुवात केली आहे. यातच ठाकरे सरकारने पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यावरही मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.

आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक असताना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मोठं विधान केले आहे. समाजातील सर्व आरक्षण रद्द करा आणि मेरिटनुसार आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत उदयनराजे म्हणाले की, मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क्स मिळूनही प्रवेश मिळत नाही, तर दुसरीकडे कमी मार्क्स मिळूनही इतर समाजातील मुलांना प्रवेश मिळतात, प्रत्येकाला देवाने बुद्धी दिली आहे. मेरिटवर आरक्षण द्यावं, सगळेच आरक्षण रद्द करावं, ज्याने कष्टच घेतले नाही त्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळतो, आणि ज्याने कष्ट घेतले पण आरक्षण नाही म्हणून प्रवेश मिळत नाही, त्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते, नैराश्य येते, काहीजण आत्महत्या करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

समाजाचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे; नेतृत्व हा गौण विषय : उदयनराजे

‘मराठा समाजावर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. गुणवत्ता असूनही अनेक मुले-मुली त्यांच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. या परिस्थितीमध्ये इतरांना ज्या पद्धतीने आरक्षण आहे, त्या पद्धतीने मराठा समाजाला देखील नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण द्यावे, ही रास्त मागणी आम्ही करत आहोत. या समाजाचे नेतृत्व कोणी करावे, यापेक्षा आरक्षणाचा प्रश्न सुटणे महत्त्वाचे आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी व्यक्त केलं होतं. शिवाजी महाराज स्मारक कृती व समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी सातारा येथे खा. उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन दि. ३ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या विचार मंथन बैठकीसाठी आमंत्रण दिले. बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्वासन दोघांनीही दिले.

मुख्य समन्वयक म्हणून संभाजीराजेंना गळ

नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय मराठा समन्वयक बैठकीत शिवाजी सहाणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षणाचे नेतृत्व स्वीकारण्याबाबत ठराव मांडला. त्यास उपस्थित २८ जिल्ह्यातील प्रतिनिधींनी हात उंचावून अनुमोदन दिले. मात्र राजेंनी ते नम्रपणे नाकारल्याने अखेर करण गायकर यांनी राज्यातील सर्व समन्वयक यांचे मार्गदर्शक म्हणून राजेंनी ‘मुख्य समन्वयक’ म्हणून काम पाहावे, अशी सूचना मांडली. त्यास राजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

समाजाचा सेवक म्हणून रस्त्यावर उतरू

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य व केंद्रस्तरीय निर्णायक लढा देण्याची वेळ येऊन ठेपली असून, अशा वेळी कोणत्याही मोठ्या जबाबदारीपेक्षा समाजाचा ‘सेवक’ म्हणून सर्वात अग्रस्थानी उभा राहीन, अशी ग्वाही छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी दिली. याच वेळी मराठा क्रांती मोर्चा व आरक्षणाचे नेतृत्व करण्यास मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते. ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या बैठका झाल्या; परंतु नाशिकमध्ये सर्वसमावेशक झालेली ही पहिलीच बैठक आहे. मराठा क्रांती मोर्चे हे समाजाने सर्व खासदार, आमदार नेत्यांना बाजूला सारून एक होत निर्णय घेतल्याने यशस्वी झाले आहेत. एक नव्हे तर तब्बल ५८ मोर्चे काढण्यात आले. त्यात समाजाची एकजूट दिसून आली. त्यामुळे आजच्या या बैठकीला आपण संभाजीराजे म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून उपस्थित राहिलो आहे. राज्यातील सर्व समन्वयकांनी एकत्र बसून महासमिती करावी व त्या अंतर्गत विविध समित्या करून त्यांना जबाबदारीचे वाटप करावे. त्यासाठी समाजातील आमदार, खासदारांना सहभागी करून घेण्यात यावे, आंदोलनाची रूपरेषा व त्यासाठी लागणारा वेळदेखील ठरवून घ्यावा. मग केंद्र सरकार असो वा राज्य सरकार यांच्याकडे जाऊन प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहू असेही संभाजीराजे यांनी सांगितले होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले