शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 12:30 PM

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावरुन राज्यसभेत घमासानगुलाम नबी आझाद यांचा सरकारवर हल्लाबोलशेतकऱ्यांशी नव्हे, तर चीन आणि कोरोनाशी लढण्याची गरज असल्याचा दिला खोचक सल्ला

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकार भावनाशून्य झाल्याची टीका केली आहे. राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद (  Ghulam Nabi Azad ) यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असताना त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मोदींसमोरच गुलाम नबी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत यांचं उदाहरण देत सरकारवर निशाणा साधला. ( Ghulam Nabi Azad slams PM Modi in Rajya Sabha )

"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं. त्यामुळे हे आंदोलन काही कायदे रद्द झाल्याशिवाय संपणारं नाही. सरकारने कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही. सरकारला शेतकऱ्यांविरोधात नव्हे, तर कोरोना आणि चीन विरुद्ध लढण्याची गरज आहे. देशासाठी जवान आणि किसान हे दोन्ही महत्वाचे आहेत", असं गुलाम नबी आझाद म्हणाले. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहातच उपस्थित होते. मोदी यांनी आझाद यांच्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मोदींनी आझाद यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. यात भाजपच्या काही खासदारांनी नारेबाजी करत गुलाम नबी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर

सभागृहाचं कामकाज सुरू होताच आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन जोरदार जुंपली. यावेळी सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं. आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन वेलमध्ये पोहोचले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली होती. गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली. या तिन्ही खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आलं. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपNarendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभा