"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:46 PM2021-03-24T15:46:52+5:302021-03-24T15:56:26+5:30

West Bengal Assembly Elections 2021 And BJP : राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

bjp worker found dead body hanging the noose vijayvargiya said didis played start | "दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"

"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021) आधी राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात (Coochbehar) दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच "राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे. 

भाजपाने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय  (Kailash Vijyavargiya) यांनी या घटनेवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. "दीदीचा खेळ सुरू, ममता सरकारच्या राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फासावर लटकवलं. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. 

एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह याआधी देखील झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मिळाला होता. कोलकाता जवळील सोनरपूर गावात ही घटना घडली होती. विकास नस्कर असं मृत कार्यकर्त्याचं नाव होतं. त्यावेळी देखील भाजपकडून टीएमसीवर गंभीर आरोप करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ममता सरकारवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये 27 मार्चपासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ते 29 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

णमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही बंगालधून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सत्ता येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे. शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये भ्रष्टाचार आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल असं म्हटलं आहे. तसेच सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे. गंगासागर मेळ्यावर लाखो रुपये खर्च करून हा मेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

Web Title: bjp worker found dead body hanging the noose vijayvargiya said didis played start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.