Amit Shah : "बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 02:12 PM2021-03-23T14:12:37+5:302021-03-23T14:24:10+5:30

West Bengal Assembly Election 2021 And Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे

bengal election amit shah shouted said formation of bjp government sit formed and send corrupt people jail | Amit Shah : "बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Amit Shah : "बंगालमध्ये सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू"; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगनाच्या गोसाबा येथे जाहीर सभा घेऊन ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालला भ्रष्टाचाराने पोखरले आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही बंगालधून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करू असं अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

सत्ता येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवू असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे. शहा यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये भ्रष्टाचार आहे. आमचं सरकार येताच एसआयटी स्थापन करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुंगात पाठवलं जाईल असं म्हटलं आहे. तसेच सरकार आल्यानंतर सुंदरवन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे. गंगासागर मेळ्यावर लाखो रुपये खर्च करून हा मेळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत राज्यात आयुष्मान भारत योजना लागू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

बंगालमध्ये वादळ आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यासाठी 10 हजार कोटी रुपये पाठवले होते. मात्र, हे पैसे लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत. पुतण्या आणि कंपनीने हा पैसा खाल्ला. मोदींनी पाठवलेल्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे. आम्ही एसआयटी स्थापन करून हा पैसा वसूल केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवायही राहणार नाही. वादळग्रस्तांसाठी आम्ही 65000 कोटींचे पॅकेज तयार करू. सुंदरवनमध्ये टुरिस्ट सर्किट तयार करण्यात येईल. दीदींनी त्यांच्या जाहीरनाम्यातून 262 आश्वासने दिली होती. मात्र ते पूर्ण केले नाहीत. त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. त्या हिशोब देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भाजपाला निवडून देऊन हिशोब द्या, असं आवाहन शहा यांनी केलं आहे.

"बंगालमध्ये दीदींचा खेळ संपला, TMC म्हणजे 'ट्रान्सफर माय कमिशन"; पंतप्रधान मोदींचा सणसणीत टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुरुलिया येथे रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचं म्हणत निशाणा साधला. तसेत दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असं म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना सणसणीत टोला देखील लगावला आहे. "भाजपाचा डीबीटी डायरेक्ट बेनिफट ट्रान्सफर, तर TMC ट्रान्सफर माय कमिशन" बनली असल्याचा टोला पंतप्रधानांनी लगावला आहे. केंद्रातील भाजप सरकार डीबीटी म्हणजे गरजूंना थेट मदत करणारी डायरेक्ट ट्रान्स्फर बेनेफिट योजना राबविते, तृणमूल काँग्रेस मात्र लोकांना लुटण्याचे काम करते, असे सांगताना मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव टीएमसी अर्थात ट्रान्सफर माय कमिशन असल्याची घणाघाती टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खेला होबे (खेळ होईल) या विधानसभा निवडणुकीच्या बहुचर्चित घोषणेला नरेंद्र मोदी यांनी पुरुलिया येथील राज्यातील पहिल्या प्रचारसभेत विकास होबे (विकास होईल) असे उत्तर दिले.

Web Title: bengal election amit shah shouted said formation of bjp government sit formed and send corrupt people jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.