शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

By मुकेश चव्हाण | Updated: September 28, 2020 12:34 IST

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली.

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊतांच्या स्पष्टीकरणानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपा शिवसेनेसोबत जाणार नसल्याचे सांगितले आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली. त्यामुळे भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं स्पष्टपणे सांगितले आहे. शिवसेनेसोबत हातमिळवण्याची इच्छा नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना - राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.

आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर

ज्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.

महत्त्व देण्यास नकार

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले. तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे