“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 15:41 IST2021-08-11T15:39:38+5:302021-08-11T15:41:51+5:30
मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे.

“मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?”; भाजपची बोचरी टीका
मुंबई:मंत्रालयासारख्या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला मंजुरी देत असल्याची घोषणा करताना मॉल्स आणि मंदिरे खुली करण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावरून, मंत्रालयाचे रुपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करत भाजपने ठाकरे सरकावर टीका केली आहे. (bjp tushar bhosale criticized thackeray govt over not open temples in state and liquor bottles found in mantralaya)
“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल
भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मंदिर उघडण्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मंदिराच्या विषयावरुन ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला होता. सगळे खुले केले, मग मंदिर का बंद, अशी विचारणा करत मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो, अशी टीका तुषार भोसले यांनी केली होती.
“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!
ठाकरे सरकारचे नाव काळ्या अक्षराने लिहिले जाईल
साधू-संतांच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारचं नाव काळया अक्षराने लिहिलं जाईल. कारण संस्कृतीचा सत्यानाश करण्याचे पाप या सरकारने केले आहे. ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार अशीच या सरकारची ओळख झाली आहे. मंत्रालयाच्या आवारात दारुच्या बाटल्या आणि मंत्रालयातील फायलींमध्ये दारु धार्जिणी धोरण असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे. या सरकारने मंत्रालयाचं रुपांतर मदिरालयात केलय. मग देवालय कशी उघडणार, अशी विचारणा करत ठाकरे सरकारने मदिरेचा विषय बाजूला ठेवून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.
"ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार"@CMOMaharashtra@OfficeofUT@Dev_Fadnavis@BJP4Maharashtrapic.twitter.com/EiDmpt6Lt3
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) August 11, 2021
दरम्यान, आता सगळे काही सुरू झालेले असताना, मंदिरे उघडण्याचा निर्णय देखील सरकारने घ्यावा. हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे. मंदिरे खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, सगळे खुले झाले, मग मंदिर बंद नकोत, अशी आग्रही मागणी आचार्य तुषार भोसले यांनी यापूर्वीही केली आहे.