"दीदी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही; भाजपात प्रवेश करून केली मोठी चूक"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 03:08 PM2021-05-23T15:08:17+5:302021-05-23T15:18:58+5:30

BJP Sonali Guha Wrote To Mamata Banerjee Apologising To Her For Leaving TMC : तृणमूल काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या एका पत्राची सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे.

bjp sonali guha wrote to mamata banerjee apologising to her for leaving tmc said i cant live without you didi | "दीदी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही; भाजपात प्रवेश करून केली मोठी चूक"

"दीदी, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही; भाजपात प्रवेश करून केली मोठी चूक"

Next

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसला जबरदस्त यश मिळाले आहे. तृणमूलच्या जागांमध्ये वाढ झाली असून राज्यातील सर्वच भागांमध्ये तृणमूलने चांगली कामगिरी केली.  निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधूनभाजपात प्रवेश करणाऱ्या माजी महिला आमदाराच्या एका पत्राची सध्या पश्चिम बंगालमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. सोनाली गुहा (BJP Sonali Guha) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं आहे. "दीदी तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. भाजपात प्रवेश करून मोठी चूक केली असं म्हटलं आहे. 

सोनाली गुहा यांनी ममता बॅनर्जी यांची माफी मागितली आहे आणि पुन्हा एकदा पक्षात परत घेण्याची विनवणी केली आहे. सोनाली गुहा तृणमूल काँग्रेसच्या चार वेळा आमदार राहिलेल्या आहेत. ममता बॅनर्जींच्या त्या अत्यंत जवळच्या मानल्या जात होत्या. मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या. माध्यमांवर नाराजी व्यक्त करत गुहा यांनीी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाकडून त्यांनी निवडणूक लढवली नाही, मात्र पक्ष मजबूत करण्याचं काम करू, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. "जसं मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही" असं म्हटलं आहे. 

"तुम्ही जर मला माफ केलं नाही तर मी जिवंत राहू शकणार नाही"

"माझा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता आणि त्याची जाणीव मला होत आहे. तिथे मला नेहमी वेगळं असल्याची जाणीव झाली. त्यांनी माझा वापर केला. मला ममतांची बदनामी करण्यास सांगितलं, पण मी असं केलं नाही. मी पुन्हा एकदा ममतांची भेट घेणार आहे" असंही सोनाली गुहा यांनी म्हटलं आहे. "भावनिक होऊन मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपात प्रवेश करून चूक केली. पक्ष सोडल्याबद्दल मी आपली माफी मागते. जर आपण मला माफ केलं नाही, तर मी जिवंत राहू शकणार नाही. कृपया मला पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून मी माझं उर्वरित आयुष्य आपल्या सहवासात घालवू शकेल."

"ज्या पद्धतीने मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याचप्रमाणे दीदी, मी सुद्धा तुमच्याशिवाय राहू शकणार नाही" असं म्हणत सोनाली गुहा यांनी आपल्याला पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये घेण्याची विनवणी ममता बॅनर्जी यांना केली आहे. एका हिंदीवेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील विविध जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये विविध राज्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र पश्चिम बंगालच्या एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी हजेरी लावली नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच नाही दिलं"; मोदींच्या बैठकीवर ममता बॅनर्जी भडकल्या, केले गंभीर आरोप

ममता यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिलं नाही असं म्हणत त्यांनी मोदींच्या बैठकीनंतर आपला संताप व्यक्त केला आहेत. तसेच केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केला. मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे."या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपाचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

Web Title: bjp sonali guha wrote to mamata banerjee apologising to her for leaving tmc said i cant live without you didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.