शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"...म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे", भाजपा नेत्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 13:13 IST

BJP Prasad Lad And Thackeray Government : भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एनआयएने अटक केली आहे. एनआयएकडून  सचिन वाझे यांना शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर भाजपा आता आक्रमक झाली आहे. सचिन वाझेंची बाजू घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता भाजपाच्या एका नेत्याने केली आहे. भाजपाचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी वाझेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. या सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे. ज्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे ही स्पष्ट मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे असं देखील म्हटलं आहे. 

"सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे. सचिन वाझेंच्या माध्यमातून अजून किती लोकांच्या हत्या केल्या गेल्या याची देखील खात्री एनआयएने केली पाहिजे अशी मागणी आहे" असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. वाझे काल सकाळी 11 वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. जवळपास 13 तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली. यानंतर आता भाजपा आक्रमक झाला असून त्यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला आहे. 

"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

"सचिन वाझेंची ताबडतोब नार्को टेस्ट करा, शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा समोर येईल"

सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपाचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी केली आहे. राम कदम यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "अनिल देशमुखजी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी" असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच "अशी कोणती नावं आहेत ज्यांना महाराष्ट्र सरकार वाचवू पाहत आहे?, नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल" असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMaharashtraमहाराष्ट्रPrasad Ladप्रसाद लाडBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAnil Deshmukhअनिल देशमुख