शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

E Sreedharan : भाजप सांप्रदायिक नाही, तर देशावर प्रेम करणाऱ्यांचा पक्ष : ई श्रीधरन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 08:29 IST

bjp is not communal party of people who loves country metro man e sreedharan said in interview : भाजपसाठी सर्व धर्म समान, सांप्रदायिक भेदभावाचा आरोप करणं अयोग्य, श्रीधरन यांचं वक्तव्य

ठळक मुद्देभाजप सांप्रदायिक पक्ष नसल्याचं ई श्रीधरन यांचं वक्तव्यभाजपसाठी सर्व धर्म समान : ई श्रीधरन

केरळ विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच मेट्रो मॅन म्हणून ओळख असलेले ई श्रीधरन यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. दरम्यान ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली प्रशंसा नाही, तर भाजपची मूल्यं आहेत. ज्यांनी त्यांना पक्षात सामील होण्यासाठी प्रेरित केलं, असं श्रीधरन यांनी सांगितलं."भाजप हा सांप्रदायिक पक्ष नाही. हा देशावर प्रेम करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे. केरळमध्ये हिंदू, ख्रिस्ती मुलींना भुरळ घालण्याचे प्रयत्न करत आहे. ज्यालाच भाजप लव्ह जिहाद असं म्हणत आहे," असं श्रीधरन म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "मी माझ्या जबाबदारींमध्ये व्यस्त होतो. आता मी समाज आणि विशेषत: आपलं राज्य केरळ यासाठी काहीतरी करू इच्छित आहे. हेच राजकारणात प्रवेश करण्याचं कारण आहे. गेल्या १५-२० वर्षात देशात युडीएफ, एलडीएफचं सरकार होतं. परंतु राज्यात मोठा कोणताही बदल दिसला नाही. २० वर्षांत केरळमध्ये एकही उद्योग आला नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे," असं श्रीधरन यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत सांगितलं. ... म्हणून भाजपशी जोडलो गेलोभले केरळमध्ये भाजपचा एकच आमदार आहे, तरी मी पक्षाची प्रतीमा बदलण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी भाजपशी जोडलो गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशीदेखील आपले उत्तम संबंध होते. देशाच्या प्रती प्रेम आणि देशाच्या हितासाठी सेवा करण्याची भावना भाजपमध्ये असल्याचंही श्रीधरन यांनी नमूद केलं.भाजपसाठी सर्व धर्म समान"मी प्रत्येक मतदाराच्या हृदयात जागा निर्माण करू पाहत आहे. मला कोणतं काम करण्याची इच्छा आहे हे मी त्यांना सांगू इच्छितो. माझ्या प्रचाराची पद्धत निराळी असेल," असं निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले. भाजप सांप्रदायिक असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की भाजप सर्व धर्मांना समान रुपात पाहतो. मोदी सरकारदेखील तेच करत आहे. मी त्यांना कधीच कोणत्या अन्य धर्मावर हल्ला करताना पाहिलं नाही. भाजपवर सांप्रदायिक भेदभावाचा आरोप अयोग्य असल्याचंही श्रीधरन म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळNarendra Modiनरेंद्र मोदीAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी