"ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा"; नितेश राणेंचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 04:59 PM2020-12-04T16:59:46+5:302020-12-04T17:02:07+5:30

BJP Nitesh Rane And Maharashtra Legislative Council polls : नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

BJP Nitesh Rane Slams Shivsena over Maharashtra Legislative Council polls | "ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा"; नितेश राणेंचा सणसणीत टोला

"ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा"; नितेश राणेंचा सणसणीत टोला

Next

मुंबई - राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुका पार पडल्या. यात महाविकास आघाडीने भाजपाला अनेक ठिकाणी चीतपट केले होते. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. याच दरम्यान भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. "ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा... मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच !!" असं ट्विट नितेश यांनी केलं आहे. तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो; देवेंद्र फडणवीस झाले चीतपट

"तीन पक्षांची 'पॉवर' जोखण्यात कमी पडलो" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजपा नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. मात्र आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची 'पॉवर' किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं" असं देखील फडणवीस म्हणाले. 

"एकटं यायचं की आघाडी करून हे आमचे वरिष्ठ ठरवतील; आम्हाला कुणी बिनकामाचा सल्ला देऊ नये"

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एक एकट्याने आमच्याशी लढावे असे खुले आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटलांनाच खडे बोल सुनावले आहे. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. आता अजित पवारांनी भाजपवर टीका केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

Web Title: BJP Nitesh Rane Slams Shivsena over Maharashtra Legislative Council polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.