“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”; राणेंचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:45 AM2021-07-01T11:45:31+5:302021-07-01T11:47:12+5:30

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याच्या कृतीवर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

bjp nilesh rane react on gopichand padalkar car attack | “तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”; राणेंचा थेट इशारा

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”; राणेंचा थेट इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देगोपीचंद पडळकर यांच्या ताफ्यावर दगडफेकभाजपनेही घेतली आक्रमक भूमिकाभाजप नेते निलेश राणे यांचा थेट इशारा

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, गाडीवर दगडफेक झाल्याच्या कृतीवर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा थेट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. (bjp nilesh rane react on gopichand padalkar car attack)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार, अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र, बुधवारी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी गोपीचंद पडळकर ताफ्यावर दगडफेड झाल्याची घटना घडली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना थेट इशारा दिला आहे. 

फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची एक काच फोडून जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठा पराक्रम केला तर एवढं समजून चला जेव्हा तुमच्या हातातली सत्ता जाईल तेव्हा फुटलेल्या काचा मोजण्यात पुढची पाच वर्षे जातील, हे लक्षात असू दे. तुम्ही तरी एकच काच फोडली आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. 

उद्या गोळा मारल्या तरी मागे हटणार नाही

महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला माहिती आहे की या घटनेमागे नेमके कोण असेल. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गोरगरिबांच्या बाजूने बोलत आहे. त्यांची बाजू मांडत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका मांडत आहे. ती आता या लोकांना आवडली नसेल. ते जे गप्पा मारत आहेत लोकशाहीच्या, फुले-शाहू-आंबेडकरांच्या, त्यांचे हेच उत्तर आहे का? वैचारिक लढाई तर विचाराने चाला. पण अशा प्रकारे उत्तर देणार असतील तर मीही गप्प बसणार नाही. आज दगड फेकून मारले आहेत, उद्या गोळ्या घालतील. पण तरी मी माझी भूमिका मांडणे सोडणार नाही, असे पडळकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ज्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार. तुम्ही मानणार असाल तर मला त्याचे देणंघेणं नाही. ही लोकशाही आहे. शरद पवार हे गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले होते. 
 

Web Title: bjp nilesh rane react on gopichand padalkar car attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.