शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता वरून कसा आदेश येतो ते पाहायचं; 'सरकार स्थापने'वर भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 19:39 IST

bjp mp narayan rane on ncp chief sharad pawar and amit shahs meeting: गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते भेटीच्या वृत्ताचं खंडन करत असताना दुसरीकडे खुद्द अमित शहांनी 'सगळ्याच गोष्टी जाहीरपणे सांगता येत नाही' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये शहा आणि पवार यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडलीराष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते शरद पवार-अमित शहांची भेट झालीच नसल्याचं सांगत असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होणार का, अमित शहा-शरद पवारांच्या भेटीचा नेमका अर्थ काय, असे प्रश्न भाजप खासदार नारायण राणेंना विचारण्यात आले. त्यावर वरून कसा आदेश येतो ते आता बघायचं. वरून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी करायची, असं उत्तर राणेंनी दिलं.पवार-शहा भेटीच्या चर्चेनंतर भाजपा आमदाराने शेअर केला 'तो' व्हिडिओअँटिलिया स्फोटकं प्रकरण, सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्यात खळबळ माजली. मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदावरून दूर करताच परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. देशमुख यांनी वाझेंना १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप सिंग यांनी केला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी देशमुख यांच्यावर शरसंधान साधलं. याबद्दल विचारलं असता राणेंनी सावध उत्तर दिलं. 'अनिल देशमुख म्हणजे राष्ट्रवादी नाही. त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकतं. अनेक मार्ग निघू शकतील,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती असून अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे, शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असेल. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्या का, यासंदर्भात माहिती नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर, खासदार संजय राऊत यांना हे सरकार टिकेल, असं वारंवार सांगावं लागतंय यातच सगळं आलं. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकार टिकेल, असे सांगावे लागते म्हणजे काहीतरी गडबड आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarayan Raneनारायण राणे Anil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस