शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 23:15 IST

bjp mla nitesh rane slams varun sardesai: भाजप आमदार नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना टोला; चार दिवसांपूर्वीच्या आरोपांची करून दिली आठवण

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहून राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. (Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month Param Bir Singh writes to CM Uddhav Thackeray)परमबीर सिंग यांच्या पत्राचा ईमेल ऍड्रेस तपासला जाणार; मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका?परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचं म्हटलं आहे.षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्नपरमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. डीजी पदावर कार्यरत असलेल्या सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते नितेश राणेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'आयपीएल बुकींकडून वसुली होत असल्याचा आरोप मी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत केला होता. वरुणचे 'वाझे'लेकी बारा', असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. (bjp mla nitesh rane slams varun sardesai)काय म्हणाले होते नितेश राणे?उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी चार दिवसांपूर्वी केली होती. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही राणे यांनी केला होता."आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालतं. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असं सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे एनआयएने वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण आणि सीडीआर तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली होती. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेBJPभाजपा