Anil Deshmukh: षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:08 PM2021-03-20T22:08:24+5:302021-03-20T22:13:25+5:30

home minister anil deshmukh hits back at parambir singh denies all the allegations: गृहमंत्री देशमुख यांनी परमबीर सिंग यांचा आरोप फेटाळला; अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

home minister anil deshmukh hits back at parambir singh denies all the allegations | Anil Deshmukh: षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न

Anil Deshmukh: षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न

Next

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. आयुक्त पदावरून दूर करण्यात आल्यानंतर सुट्टीवर गेलेल्या सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र लिहून राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. (Anil Deshmukh asked Waze to collect Rs 100 crore for him per month Param Bir Singh writes to CM Uddhav Thackeray)

"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर देशमुख यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय अब्रुनुकसानीचा दावा दाखला करणार असल्याचं म्हटलं आहे. (home minister anil deshmukh hits back at parambir singh denies all the allegations)

मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

अनिल देशमुख यांचं प्रसिद्धीपत्र जसंच्या तसं-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. 

- सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ? 

- आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर श्री. परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी श्री. पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून श्री. परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना श्री. परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय? 

- 18 मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.

- पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. 16 वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. 

- परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे. 

- स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.

- सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते? 

- विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. 

- स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे 

-  मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.


 

Web Title: home minister anil deshmukh hits back at parambir singh denies all the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.