BJP MLA Gopichand Padalkar targets CM Uddhav Thackeray over Corona Situation | “मनसेची भूमिका योग्य, शिवसेनेला टोला”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

“मनसेची भूमिका योग्य, शिवसेनेला टोला”; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ठळक मुद्देलॉकडाऊन करणार असं म्हणता त्याआधी गोरगरिबांची व्यवस्था करा, तुम्ही लॉकडाऊन करणार आणि घरात बसणारराज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि सोडवून घेणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहेसामना किती लोक वाचतात हे माहिती नाही, आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येत नाही, मी कधी ते वृत्तपत्र वाचलं नाही

सिंधुदुर्ग – भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना वाढलाय असं सांगून राज्याचं अधिवेशन टाळत असाल तर राज्यातील जनता पाहत आहे, ती तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.(BJP Gopichand Padalkar Criticized Thackeray Government over Corona increase in Maharashtra)

आमदार गोपीचंद पडळकर(BJP MLA Gopichand Padalkar) म्हणाले की, ठाकरे सरकारला कुठल्याचं परिस्थितीचं गांभीर्य नाही, कोरोना काळात लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर लॉकडाऊन उघडल्यानंतरही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला १०० हून अधिक पत्र पाठवलं, त्यात कोरोना चाचणी थांबवू नको, जास्तीत वाढवा असं म्हटलं होत, तेव्हा सरकारने कानडोळा केला, विरोधी पक्षनेत्यांचे ऐकलं नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच १ मार्चला अधिवेशन आहे म्हटल्यावर पुन्हा संचारबंदी, कोरोना, कलम १४४, लॉकडाऊन करणार असे प्रयोग सुरू झालेत, लॉकडाऊन करणार असं म्हणता त्याआधी गोरगरिबांची व्यवस्था करा, तुम्ही लॉकडाऊन करणार आणि घरात बसणार, पण महाराष्ट्रातले सगळे खेड्यापाड्यातील गरीब जनता आहे, त्यांची चुल पेटणार कशी? या लोकांना उत्पन्नाचा दुसरा सोर्स नाही, काम केल्यावरच त्यांचे पोट भरतं, शिमग्याला चुकल्याप्रमाणे हे ठाकरे सरकार बोंब मारतं, केंद्र सरकारने लॉकडाऊनकाळात अनेकांना मदत केली परंतु राज्य सरकारने एकतरी योजना दाखवावी ज्याच्यामुळे जनतेला मदत मिळाली असेल असं आव्हान पडळकरांनी राज्य सरकारला केले.

मनसेची भूमिका योग्य  

अधिवेशन टाळण्यासाठी कोरोना वाढलंय असं दाखवलं जात आहे असा आरोप मनसेने राज्य सरकारवर केला होता, त्यावर पडळकरांनी मनसेची(MNS) भूमिका योग्य असल्याचं म्हणत वाढीव वीजबिलाने राज्यातील जनता त्रस्त आहे, सरकारला जनतेशी काही देणंघेणं नाही, मनसेने मांडलेली भूमिका योग्यच आहे. अधिवेशन पूर्णवेळ झालं पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे, राज्यातील जनतेचे प्रश्न मांडणे आणि सोडवून घेणे ही विरोधी पक्षांची जबाबदारी आहे, पण अधिवेशन २ दिवस घेणार असाल आणि कोरोना झाला म्हणून अधिवेशन टाळणार असाल हे जनता पाहत आहे. यापुढे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत असं त्यांनी म्हटलं.

सामना आमच्या जिल्ह्यात कोणी वाचत नाही

सामना किती लोक वाचतात हे माहिती नाही, आमच्या जिल्ह्यात सामना पेपर येत नाही, मी कधी ते वृत्तपत्र वाचलं नाही, तुम्ही टीव्हीवर दाखवता तेव्हा सामना दैनिक अस्तित्वात आहे हे लोकांना कळतं अन्यथा सामना कोणी वाचतही नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेचे फार दखल घ्यायचं कारण नाही अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेला(Shivsena) टोला लगावला आहे.

Web Title: BJP MLA Gopichand Padalkar targets CM Uddhav Thackeray over Corona Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.