शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

"बोगस कागदपत्रांच्या आधारे बांग्लादेशी नागरिक बनला भाजप पदाधिकारी; हाच का संघ जिहाद?"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 8:52 AM

Congress Leader Sachin Sawant slams BJP and RSS: काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा भाजपला सवाल; रुबेल शेखवरून भाजपवर शरसंधान

मुंबई: बांग्लादेशी नागरिक उत्तर मुंबई भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी एक व्हिडीओ ट्विट करत भाजपचा समाचार घेतला आहे. भाजपचा पदाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. (Congress Leader Sachin Sawant slams BJP and RSS)"सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड"भाजपचा पदाधिकारी असलेला रुबेल शेख अवैध कागदपत्रांच्या आधारे भारतात राहत होता. शेख भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली. त्याचं वय २४ वर्ष आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. हा भाजपचा संघ जिहाद आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले तर काहीजण पाकिस्तानी आयएसआयचे एजंट निघाले हेही आपल्यासमोर असताना आता भाजपची प्रगती त्याच्याही पुढे झाली असून उत्तर मुंबई भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष चक्क बांग्लादेशी नागरिक रुबेल शेख निघाला. भाजपत ‘संघजिहाद’ ही नवीन पद्धत सुरु झाली आहे का आणि सीएए कायद्यात भाजपसाठी काही वेगळी तरतूद केली आहे का? याचं उत्तर भाजपनं द्यायला हवं, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे."दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही"यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबईमध्ये बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिक रुबेल शेखला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केली जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपाचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपात तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपने सुरू केली आहे काय याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे असं सावंत म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाSachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक