शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

उत्तर प्रदेशात भाजपाला फटका बसणार; 41 जागा घटणार- सर्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 7:22 PM

सपा-बसपाला अच्छे दिन येण्याची शक्यता

नवी दिल्ली: समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा मोठा फटका भाजपाला बसण्याची शक्यता आहे. भाजपाच्या उत्तर प्रदेशातील 41 जागा कमी होऊ शकतात, असा अंदाज एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मित्रपक्षांसह उत्तर प्रदेशातील तब्बल 73 जागा जिंकल्या होत्या. त्या यंदा 32 वर येतील, असा अंदाज आहे. तर सपा-बसपा आघाडीला 44 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या जागा 2 वरुन 4 जातील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या दणदणीत विजयात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. मात्र यंदा उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसू शकतो. भाजपा आणि मित्र पक्षांच्या जागा 73 वरुन थेट 32 वर येऊ शकतात. सपा-बसपाच्या आघाडीचा मोठा फटका बसण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. सपा-बसपा 2014 मध्ये स्वतंत्र लढेल. त्यावेळी समाजवादी पार्टीला केवळ पाच जागा मिळाल्या होत्या. तर मायावतींच्या बसपाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र यंदा या दोघांच्या आघाडीला 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी काँग्रेसनं प्रियंका गांधींकडे सोपवली आहे. त्यांच्याकडून सध्या विविध भागांचे दौरेदेखील सुरू आहेत. मात्र याचा फायदा काँग्रेसला होताना दिसत नाही. काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील जागा 2 वरुन 4 वर जातील, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत.