शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजप नेत्यांच्या चौकश्या होणार?; संजय राऊतांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Published: November 25, 2020 11:05 AM

ED raids Shiv Sena MLA Pratap Sarnaik: शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घर, कार्यालयांवर ईडीच्या धाडी; राजकारण तापलं

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (मंगळवारी) सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यानंतर आज प्रताप सरनाईक आणि विहंग यांची चौकशी करण्यात येणार आहे. यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या सूडाचं राजकारण सुरू आहे. पण राज्यात त्यांची सत्ता नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.रिक्षा चालक ते १२६ कोटींचा मालक; जाणून घ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा प्रवास आम्ही चौकशांना घाबरत नाही. चौकशांना आता तुम्ही घाबरायला हवं. कारण राज्यात तुमचं सरकार नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सध्या जुनी थडगी उकरण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. सध्या ते उत्खनन करत आहेत. आता ईडीवाले खोदकाम करत मोहंजोदडो, हडप्पापर्यंत जातील, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का?, या प्रश्नाला राऊत यांनी अद्याप तरी आलेली नाही. मी वाट पाहतो आहे. सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं उत्तर दिलं....म्हणून ईडीनं सरनाईकांच्या घरावर छापे टाकले; भुजबळांनी सांगितलं राज'कारण'आर्थिक गैरव्यवहार केलेल्या १०० नेत्यांची यादी माझ्याकडे आहे, असा दावा राऊत यांनी केला होता. त्याबद्दल विचारलं असता, सध्या सुरू असलेलं सुडाचं अन् बिनबुडाचं राजकारण संपू द्या. आज पत्ते तुम्ही पत्ते पिसताय, पण डाव आम्ही उलटवू, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला. सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी संपू द्या. मग १२० प्रमुख नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाला पाठवेन. त्यांच्यावर काय कारवाई होते बघू, असं राऊत यांनी सांगितलं.'त्या' १०० लोकांची यादी द्या, कारवाई होईल; फडणवीसांचा संजय राऊतांना 'शब्द'प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर छापे टाकणं यात मर्दानगी कसली?, असा सवाल काल राऊत यांनी विचारला होता. त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी 'कंगना कार्यालयात नसताना तिचं कार्यालय पाडण्यात मर्दानगी होती का?', असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर भाष्य करताना कंगनानं मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं, त्याचं समर्थन भाजप नेते करतात का?, असा सवाल राऊत यांनी विचारला. मुंबईला पीओके म्हणणारे घरी असोत वा नसोत, त्यांच्यावर कारवाई होणारच, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतpratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय