शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

"कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावानं कांगावा करणार...."; भाजपचा ठाकरे सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 8:01 PM

राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना

ठळक मुद्देराज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची आवश्यकता असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनाजनहित याचिकेवर न्यायालयात पार पडली सुनावणी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून, रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यांमधील एका याचिकेवर सुनावणी करताना राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याची सूचना न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. यानंतर भाजपचे महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे."राज्य सरकारवर न्यायालयानं सणसणीत ताशेरे ओढलेत. पण कोणतेच काम न करता वाचाळपणा, केंद्राच्या नावाने कांगावा करणार, अधिकाऱ्यांना ‘टार्गेट’ देणार. राज्य सरकार या ताशेऱ्यातून काही धडा घेणार का? मुख्यमंत्री घराबाहेर पडणार का?," असं म्हणत उपाध्ये यांनी टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली.  मुंबई उच्च न्यायालयानंही किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करा, अशा सूचना राज्य सरकारला केल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिवीर, खाटा इत्यादींचा तुटवडा व अन्य प्रश्नांवर दाखल जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्यात किमान १५ दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करावा. कारण आताच्या निर्बंधांनंतर लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. यातून हेतू साध्य होणार नाही. अत्यंत अत्यावश्यक असेल, तरच घराबाहेर येण्याची परवानगी द्यावी. १५ दिवसांसाठी हा उपाय केला तर कोरोनाला अटकाव केला जाऊ शकतो, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाMumbai High Courtमुंबई हायकोर्ट