शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 14:52 IST

chitra wagh hits back at ncp mla amol mitkari: मिटकरींच्या टीकेला चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: सिंहाच्या तालमीत तयार झालेले वाघ आता केवळ नावापुरते उरले आहेत, अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार अमोल मिटकरींना भाजप नेत्या चित्रा वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी भावा, माझे आणि ‘माझ्या बापा’चे (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) यांचे काय संबंध आहेत, त्यांनाच विचार, अशा शब्दांत वाघ यांनी मिटकरींना सुनावलं. (bjp leader chitra wagh hits back at ncp mla amol mitkari)ठाकरे सरकारचं काम कसं चाललंय?; फडणवीसांनी सांगितली 'एका स्टूल खरेदी'ची भन्नाट गोष्ट'अमोल मिटकरी आता आला आहे. भावा माझ्या, तुला काय माहिती? पक्षानं तुला आमदारकी दिली आहे. नेटानं काम कर,' असा सल्ला चित्रा वाघ यांनी दिला. 'चांगला आवाज आहे. बोलत राहा. बाकी माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, ते बापालाच जाऊन विचार. साहेबांना विचार, ते तुला सांगतील,' असं प्रत्युत्तर वाघ यांनी मिटकरींना दिलं.फडणवीसांचे प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांची तात्काळ घोषणा; वीज ग्राहकांसाठी सरकारचा मोठा निर्णयकाय म्हणाले होते अमोल मिटकरी?पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, या प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. वाघ यांनी अतिशय आक्रमकपणे हा विषय लावून धरला. त्यावर मिटकरींनी ट्विट करत टोला लगावला. 'वाघाची डरकाळी व्याघ्रवाड्यात अधिक उठावदार दिसत होती, पण कळपात गेल्यावर व्याघ्र डरकाळीसुद्धा हवेत कशी विरून जाते, हेही आज प्रत्यक्ष अनुभवले. शेवटी सिंहाच्या तालमीतील वाघ उरले केवळ नावापुरते,' असं मिटकरींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSharad Pawarशरद पवारSanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण