शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 11:43 IST

Chitra Wagh critisizes Uddhav Thackeray:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे...'

ठळक मुद्देशुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Cm Uddhav Thackeray ) स्वत: त्यांची गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरला(Pandharpur) गेले होते. त्यावरुन मुख्यमंत्र्यांना अपघातग्रस्तांकडे यायला वेळ नाही, पण पंढरपूरला जायला वेळ आहे, अशी विरोधकांकडून टीकाही झाली होती. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतलयं. 

महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. रायगड, रत्नागिरीत, चिपळुनमध्ये पुराने हाहाकार माजवला आहे. गावच्या गावं पाण्याखाली गेल्याने नागरिकांसमोर मोठं संकट उठं टाकलं आहे. इतकी भीषण परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांनी अजून कोकणाचा दौरा केला नाही. त्यावरुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?', असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे. 

कोकणात पावसाचा धुमाकूळसंपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान  विभागाकडील माहितीनुसार, शुक्रवारीदेखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेChitra Waghचित्रा वाघRainपाऊसfoodअन्नRaigadरायगडChiplunचिपळुणkolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबईPuneपुणे