BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Corona Vaccine Shortage | "गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं", भाजपाचा सणसणीत टोला

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं", भाजपाचा सणसणीत टोला

मुंबई - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रातील एकंदरीत कोरोना परिस्थितीवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाराष्ट्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून आता त्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी जनतेत भीतीचं वातावरण निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन यांनी देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. हर्षवर्धन यांनी देशात परिस्थिती नियंत्रणात असून, अनेक त्रुटी दाखवून दिल्या. याच दरम्यान आता भाजपा नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. 

"गोरगरिबांसाठी मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला होता. "घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी याआधीही निशाणा साधला होता. "मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा" असं म्हटलं होतं. 

"सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं"

स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. यावरून भाजपाने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला. "सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन... निमंत्रण पत्रिकेतून 'हिंदुहृदयसम्राट' गायब, MMRDA चे मंत्री एकनाथ शिंदे गायब, ज्यांच्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शक्य झाले ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गायब... नावे फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची" असं म्हणत ठाकरे सरकारवर अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली होती.

 

English summary :
BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Corona Vaccine Shortage

Web Title: BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Thackeray Government Over Corona Vaccine Shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.