शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय...; भाजपा नेत्याचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 11:44 IST

शेतकरी आंदोलनात भाजपचा एक शिरल्याचा राऊत यांनी केला होता आरोप.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात भाजपचा एक शिरल्याचा राऊत यांनी केला होता आरोप.लाल किल्ल्यात जे घुसले ते खरंच शेतकरी होते का? राऊत यांचा सवाल

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर काही आंदोलकांनी लाल किल्ल्यातही प्रवेश करत मोडतोड केली होती. त्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होता. दरम्यान, यावर शिवसेनेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज एक प्रतिक्रिया दिली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनादरम्यान भाजपाचा एक गट घुसल्यानं आंदोलन हिंसक झालं, असा आरोप त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला होता. यावरून आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. दरम्यान, भातखळकर यांनी राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. "महाराष्ट्रातल्या धुतराष्ट्राचा संजयही दृष्टिहीन झालाय," असं म्हणत भातखळकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. तर दुसरीकडे भातखळकर यांनी मुंबई महानगरपालिकेवरही जोरदार टीका केली. एका वृत्ताचा हवाला देत "मुंबईतील ५०० चौरस  फुटांखालील घरांना मालमत्ता करात १०० टक्के माफी देण्याची घोषणा  हवेतच विरली आणि नेहमीप्रमाणे यु टर्न घेऊन सत्ताधारी शिवसेनेने सर्व साधारण दहा टक्के सवलतीची पाने मुंबईकरांच्या तोंडाला पुसली," असं म्हणत त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवरही जोरदार टीका केली.काय म्हणाले होते राऊत?"सरकारनं एकप्रकारे दडपशाही सुरू केली आहे. लाल किल्ल्यावर जे घुसले ते खरोखरंच शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होत आहे. लाल किल्ल्यावर काही जणांना फुस लावून पाठवण्यात आलं होतं. ते आता कुठे फरार झाले, गायब झाले याचा तपास करावा. जे आता फोटो समोर येत आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत आहेत. सिद्धू वगैरे हे लोक कोण आणि कोणाचे आहेत याचा तपास करावा. सरकारला शेतकऱ्यांना चिरडून दडपशाही करायची आहे. त्याच कारस्थानाचा एक भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडू त्यातील एक गट भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलनात घुसला होता," असा आरोप राऊत यांनी केला होता.

टॅग्स :BJPभाजपाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे