गुंडांबाबत काही समस्या असल्यास कधीही फोन करा. मला इंटरनॅशनल डॉन ओळखतात, असं वक्तव्य करणारे भाजपचे नेते गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी नवी मुंबईत केली. वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टोला लगावला. "गणेश नाईक यांनी भाषणातील विधानाची एसआयटी चौकशी करायची तर मग, तसे बरेच विषय आहेत. आझाद काश्मीरचा बोर्डवाली मेहक प्रभू, शर्जिल, त्याला पळून जायला मदत करणारे, पूजा चव्हाणचा मृत्यू अशा ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील. जाऊ द्या ना ताई! नवी मुंबईत भाजप जिंकणार हे जनतेनेच ठरवलंय," असं म्हणत शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुप्रिया सुळेवर निशाणा साधला.
जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 11:31 IST
Ashish shelar on Supriya Sule : आपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, नवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास
जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला
ठळक मुद्देआपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, शेलार यांचं वक्तव्यनवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास