“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 02:31 PM2021-06-25T14:31:28+5:302021-06-25T14:35:30+5:30

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

bjp kirit somaiya demands that cbi should interrogate anil parab and milind narvekar | “मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

Next
ठळक मुद्देकिरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदमिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याच्या बांधकामाचा व्हिडिओ दाखवलामिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करण्याची मागणी

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी केली असताना, आता दुसरीकडे शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत, अशी टीकाही भाजपने केली आहे. (bjp kirit somaiya demands that cbi should interrogate anil parab and milind narvekar)

भाजप नेते किरीट सौमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन सदर मागणी केली आहे. यावेळी भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. मिलिंद नार्वेकरांना दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब याच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य दुमजली बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. त्या जागेची किंमत आताच्या घडीला १० कोटी आहे. या कामाला बहुतेक  पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांचा गाइडन्स आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओही दाखवला. यामध्ये एका बंगल्याचे बांधकाम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 

“उत्तर प्रदेशची जनता भाजपला कंटाळलीय, आम्ही ५ वर्षांत ५ मुख्यमंत्री देऊ”

पिता-पुत्रांकडून बंगल्यांची काळजी?

अनिल परब यांच्या बंगल्यावर मिलिंद नार्वेकर जातात व मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर अनिल परब जात असतात, आणि या दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात, असा दावा करत एवढे होऊनही काही कारवाई नाही. शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. 

ते मुरूड तुमचं, हे मुरूड आमचं!

कोकण किनारपट्टीवर दापोली मुरूड भागात अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर बंगले बांधत आहेत. तर, अलिबागजवळील मुरूड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर यांचे बंगले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांची बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.  

पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण!

दरम्यान, अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आता केव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला आहे, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. एवढेच नाही तर अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असून, अनिल परब यांच्यानंतर मिलिंद नार्वेकरांचा नंबर असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
 

Web Title: bjp kirit somaiya demands that cbi should interrogate anil parab and milind narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.