"तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:16 PM2021-04-20T13:16:24+5:302021-04-20T13:27:31+5:30

BJP Keshav Upadhye Reaction Over Tanmay Fadnavis Covid Vaccination : तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काँग्रेसने यावरून टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान आता लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याने आता प्रत्युत्तर दिलं आहे. 

BJP Keshav Upadhye Reaction Over Tanmay Fadnavis Covid Vaccination | "तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर 

"तो' तन्मय तर फडणवीसांचा लांबचा नातेवाईक'; लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याचं प्रत्युत्तर 

googlenewsNext

मुंबई – राज्यात एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकारण होत असताना दुसरीकडे कोरोना लशीवरून सत्ताधाऱ्यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) याने कोरोना लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियात टाकल्यानंतर काँग्रेसने भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे. तन्मय फडणवीस यांना कोरोना लस दिल्याचा फोटो व्हायरल झाल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. तन्मयचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काँग्रेसने यावरून टीकेची झोड उठवली आहे. याच दरम्यान आता लसीकरणाच्या वादावरून भाजपा नेत्याने आता प्रत्युत्तर दिलं आहे. 

"का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय?" असं म्हणत महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांना स्वतःचा प्रभाव वापरायचा असता तर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीला कोरोनाची लस दिली असती. अजूनही त्यांनी तसे केलेले नाही. का उगाच कोण्या लांबच्या नातेवाईकाचे लसीकरण त्यांना चिटकवायचा प्रयत्न करताय? शिवसेनेच्या आमदार, महापौरांनी पात्र नसताना लस घेतलीहोती, त्याचेआधी बोला" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 काँग्रेसने ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रेसनं म्हटलंय की, ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच तन्मय फडणवीस ४५ वर्षापेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणे लसींचासुद्धा गुप्त साठा आहे का? अशाप्रकारे प्रश्नांची सरबत्ती काँग्रेसने विचारली आहे.  

कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यापासून अनेक जण सोशल मीडियात लस घेतलेल्याचे फोटो टाकतात. तन्मय फडणवीस यानेही इन्स्टाग्राम खात्यावर त्याचे लस घेतलेल्या फोटो टाकले होते. परंतु हा फोटो व्हायरल झाला आणि देवेंद्र फडणवीस गोत्यात आले. त्यानंतर तातडीनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा फोटो डिलीट करण्यात आला मात्र तोपर्यंत सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला होता. सत्ताधारी पक्षांना भाजपावर कुरघोडी करण्याची आयती संधीच सापडली. तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते. यावरून काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे.

Web Title: BJP Keshav Upadhye Reaction Over Tanmay Fadnavis Covid Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.