शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

"रोहित पवारांचं धोरण म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उधार, आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 15:05 IST

BJP Gopichand Padalkar And NCP Rohit Pawar : "सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते,दिग्दर्शक का गप्प होते?"

मुंबई - भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावरून पडळकरांनी निशाणा साधला आहे. "ये पब्लिक है सब जानती है!" असं म्हणत एका फेसबुक पोस्टद्वारे पडळकरांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. "सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या वरती बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते?" असा सवाल केला आहे. 

"वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यावर  प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी एकूण ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी १.५ कोटी विद्यापीठ व १.५ कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठ १ कोटीचा निधी द्यायला तयार होतं, त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली पण हे  सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे 'पई पाव्हण्यांचं सरकार' याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय.कारण पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करून आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावलीये" असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. 

ये पब्लिक है सब जानती है!

सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात...

Posted by Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर on Friday, February 19, 2021

"रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत 'पोस्टर बॉय' बनवायचंय का?"

"स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलंय. आणि त्यांना समितीवर घेतल्याघेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला 'पोस्टर बॉय' बनवायचंय का? मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते,राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख साहेब ज्यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केल.त्यांच नाव ७ नंबर ला टाकून नेमक तुम्हाला काय साध्य करायच होत. मंत्री उदय सामंत जी यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे जी व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत."

"साध्याच माणसांचा एल्गार येत आहे,  हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही"

"रोहित पवारांचं धोरण म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उधार'.. आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड?  जिथं जिथं अहिल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येतायेत. हे कालच्या जेजूरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे.  समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय. पण एक लक्षात ठेवा.. आता, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे,  हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही...." असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणत गोपीचंद पडळकरांनी घणाघाती टीका केली आहे. 

 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरRohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण