शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

ओबीसी आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 12:14 PM

OBC reservation in local bodies: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे.

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे. राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने ओबीसींच्या आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाणे, नाशिकसह राज्यातील विविध भागांत भाजपाच्यावतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. 

नुकत्याच रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ठाण्यामध्ये  भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदर संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या आदेशानुसार तीव्र बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ  सचिन केदारी  यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, नाशिकमध्येही भाजपाच्या वतीने ओबीसी आरक्षणासाठी तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले. पंचायत राज मध्ये ओबीसींचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नाशिकमध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने  न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन न केल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे असा आरोप करून भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्यातील महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला तसेच ओबीसींच्या आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी शहराध्यक्ष विजय साने, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष हिमगौरी आडके यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 

अहमदनगरमध्येही  भाजपा ओबीसी मोर्चाचेवतीने ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण त्यांना परत मिळवून देणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून निवेदन देण्यात आले.  यावेळी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, प्रकाश चित्ते, युवराज पोटे, वसंत लोढा, सचिन पारखी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणBJPभाजपाthaneठाणेNashikनाशिक