बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

By हेमंत बावकर | Published: October 24, 2020 07:27 PM2020-10-24T19:27:18+5:302020-10-24T21:39:02+5:30

Bihar Elections Opinion Poll 2020: बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे. 

Bihar's first opinion poll came; Competition between Nitish Kumar and Tejaswi Yadav | बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

बिहारचा दुसरा ओपिनिअन पोल आला; नितीश कुमार-तेजस्वी यादव यांच्यात स्पर्धा रंगणार

googlenewsNext

पाटना : बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2020) प्रचारात भाजपा उमेदवारांच्या सभांना फारशी गर्दी होत नाहीय. तर दुसरीकडे लालूंच्या पक्षाच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अशातच ABP CVoter ने ओपिनिअन पोलचा पहिला सर्व्हे जाहीर केला आहे. गेल्या आठवड्यात इंडिया टुडेने ओपिनिअन पोल दिला होता.


या ओपिनिअन पोलनुसार बिहारच्या सीमांचलमधील 24 जागांवर नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए बाजी मारताना दिसत आहे. एनडीएच्या खात्यात 11 ते 15 जागा जाण्याची शक्यता आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला 8 ते 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे एनडीएतून बाहेर पडत निवडणूक लढवत असलेला पक्ष लोक जनशक्तिच्या पारड्यात भोपळा पडण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतरांना 1-1 जागा जाण्याचा अंदाज आहे. 


बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला 71 विधानसभा जागांवर निवडणूक होणार आहे. यामध्ये कहलगांव, सुल्तानगंज, अमरपुर, धौरैया, बांका, कटोरिया, बेलहर, तारापुर, मुंगेर, जमालपुर, सूर्यगढ़ा, लखीसराय, शेखपुरा, बरबीघा, मोकमा, बाढ़, मसौढ़ी, पालीगंज, बिक्रम, संदेश, बड़हरा, आरा, अगिआँव, तरारी, जगदीशपुर, शाहपुर, ब्रहमपुर, बक्सर, डुमरांव, राजपुर, रामगढ़, मोहनियां, भभुआ, चैनपुर, चेनारी, सासाराम, करगहर, दिनारा, नोखा, डिहरी, काराकट, अरवल, कुर्था, जहानाबाद, घोसी, मखदुमपुर, गोह, ओबरा, नवीनगर, कुटुम्बा, औरंगाबाद, रफीगंज, गुरूआ, शेरघाटी, इमामगंज, बाराचट्टी, बोध गया, गया टाउन, टिकारी, बेलागंज, अतरी, वजीरगंज, रजौली हिसुआ, नवादा, गोबिंदपुर, वारसलीगंज, सिकंदरा, जमुई, झाझा आणि चकाई अशा जागा आहेत. 


सीमांचल भागातील मतदारांनी 28 टक्के मते एनडीएला, महाआघाडीला 46 टक्के मते आणि पासवान यांना 4 टक्के व इतरांना 22 टक्के मतदान करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार कोट्यधीश

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१३ मधील अहवालात बिहारमधील ३३.७४ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली जगत आहे, असे म्हटले होते. आता राज्यात विधानसभेच्या या व पुढील महिन्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानात कोट्यवधींची संपत्ती असलेले उमेदवार अनेक संख्येने दिसतात. 

असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्सने (एडीआर) मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले की, पहिल्या टप्प्यात एक हजार ६४ उमेदवार असून, त्यातील ३७५ जणांकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. कोट्यवधी संपत्तीचे मालक असलेल्या उमेदवारांची टक्केवारी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये जास्त आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाचे पहिल्या टप्प्यात ३५ उमेदवार आहेत. त्यापैकी ३१ हे कोट्यवधी आहेत. त्यांची सरासरी संपत्ती ही ८.१२ कोटी रुपयांची आहे. जनता दलाचा मित्र पक्ष  भाजपचे २९ पैकी २४ उमेदवार हे कोट्यधीश असून, त्यांची सरासरी संपत्ती ही ३.१० कोटींची आहे. राजदकडेही कोट्यवधींची संपत्ती असलेल्या उमेदवारांची यादीच आहे. 

Web Title: Bihar's first opinion poll came; Competition between Nitish Kumar and Tejaswi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.