शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

रालोआने गुंडाळली ‘सुशांतला न्याय’ मोहीम, बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात राजपूतच्या मृत्यूचा साधा उल्लेखही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 1:43 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. (Bihar Assembly election)

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या गूढ मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर एक ना अनेक प्रकारचे आरोप करून वातावरण तापवल्यानंतर मात्र राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) नेत्यांंनी पूर्णपणे शांत धोरण अवलंबिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे ‘जस्टीस फॉर एसएसआर’ ही मोहीम सुरू करण्यात आघाडीवर होते. त्यांनी सीबीआय चौकशीचा आदेश देण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आज नितीशकुमार हे राजपूतच्या मृत्यूबद्दल शब्दही उच्चारत नाहीत. भाजपनेदेखील पाटणा, दिल्ली आणि मुंबईत महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारला दोन पावले मागे रेटण्यासाठी सुरात सूर मिसळला होता आणि ठाकरेंविरुद्ध एक ना अनेक आरोप केले होते.

सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि एनसीबी या तीन केंद्र सरकारच्या यंत्रणा सुशांतची मैत्रीण आणि इतरांच्या मागे लावल्या होत्या. त्यात बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडेय यांनी ते प्रकरण राजकीय कारस्थान बनवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. नंतर पांडेय यांनी नोकरी सोडली व जनता दलाकडून (यु) तिकीट मागून ते राजकीय आखाड्यात उतरले.

गेल्या १४ जून रोजी राजपूतचा झालेला मृत्यू हा मुंबई पोलिसांंनी आत्महत्येचे साधे प्रकरण म्हणून विचारात घेतले होते. प्रचार मोहीम सुरू असताना राजपूत प्रकरणावर शब्दही उच्चारला नाही. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेले राजपूतचे कुटुंबीयही आता शांत झाले. राजपूतच्या बहिणी हेळसांड करणे आणि चुकीची औषधे दिल्याबद्दल पोलीस प्रकरणांना तोंड देत आहेत. सहारसा जिल्ह्यात भाजपचा उमेदवार असलेला सुशांतसिंहचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू याने तो राजकीय विषय बनवला नाही. सीबीआयने ‘तपास सुरू आहे’ याशिवाय काहीही न म्हटल्यानंतर प्रकरणच गार पडले.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंग