शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘’मी मोदींचा हनुमान, गरज पडल्याच छाती चिरून दाखवेन,’’ चिराग पासवान यांचे विधान

By बाळकृष्ण परब | Updated: October 16, 2020 20:44 IST

Bihar Assembly Election 2020 News : भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे.

ठळक मुद्देमाझा पक्ष २० वर्षे जुना आहे. मग माझ्या पक्षाचा विचार आणि भूमिका वेगळी का असू शकत नाहीत?भाजपाचे ज्येष्ठ नेते जे काही बोलत आहेत ते का बोलत आहेत, याची जाणीव मला आहेलोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मुख्यमंत्री त्रस्त झाले आहेत

पाटणा - केंद्रात मोदी सरकारसोबत सत्तेत असतानाही लोकजनशक्ती पार्टीने बिहारमध्ये एनडीएविरोधात भूमिका घेतल्याने बिहारमधील राजकारणात अजब परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांसोबत असलेल्या भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकजनशक्ती पार्टीचा उल्लेख मतं खाणारा पक्ष असा करत टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी मोठे विधान केले आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी मला मोदींचे फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. जर गरज पडली तर मी माझी छाती चिरून दाखवेन, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहे.प्रकाश जावडेकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चिराग पासवान म्हणाले की, माझा पक्ष २० वर्षे जुना आहे. मग माझ्या पक्षाचा विचार आणि भूमिका वेगळी का असू शकत नाहीत? भाजपाचे ज्येष्ठ नेते जे काही बोलत आहेत ते का बोलत आहेत, याची जाणीव मला आहे. लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याने मुख्यमंत्री त्रस्त झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी मला मोदींचे फोटो वापरण्याची गरज नाही. ते माझ्या हृदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. जर गरज पडली तर मी माझी छाती चिरून दाखवेन. मात्र मात्र मुख्यमंत्र्यांनी मोदींचा फोटो लावण्याची गरज आहे, कारण त्यांनी नेहमी मोदींचा विरोध आणि अपमान केला आहे, असा टोला पासवान यांनी लगावला आहे.चिराग पासवान म्हणाले की, बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र हे सरकार भाजपा आणि लोजपाचे असावे, यामध्ये जेडीयूचा समावेश असू नये. बिहारमध्ये भाजपा आणि लोजपाचे सरकार स्थापन व्हावे, असा माझा संकल्प आहे, असे चिराग पासवान यांनी सांगितले.बिहारमध्ये एनडीएशी असलेले नाते तोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असलेल्या लोकजनशक्ती पार्टीवर आज भाजपाने जोरदार टीका केली. लोकजनशक्ती पार्टी हा केवळ मते खाणारा पक्ष आहे, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगावला होता. लोकजनशक्ती पार्टीचे नेते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे केवळ स्वार्थ साधण्यासाठी आणि दिशाभूल करणारे राजकारण करण्यासाठी घेत आहेत, अशी टीका केली होती.दरम्यान, चिराग पासवान यांनी दिवंगत रामविलास पासवान यांची एक ऑडिओ क्लिप शेअर केली. या ऑडिओमध्ये रामविलास पासवान अन्याय न करण्याची आणि अन्याय सहन न करण्याची शिकवण देत आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकLok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी