शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 5:00 AM

आज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे.

- वसंत भोसलेआज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे.‘मा, माटी, मानुश’ या घोषवाक्यासह बंगाली माणसांची अस्मिता २०११ जागृत करून, अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भारतीय राजकारणात इतिहास रचला. लोकशाही मार्गाने सलग ३४ चौतीस वर्षे सत्तेवर राहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कम्युनिस्टांचा पराभव त्यांनी केला. त्यांचा हा संघर्ष साधा नव्हता. बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला पराभूत करण्याचे कॉँग्रेससह सर्व पक्षांचे प्रयत्न संपले होते. सलग सहा निवडणुका जिंकणाºया डाव्या आघाडीचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होण्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. २९ वर्षांच्या तरुण ममता बॅनर्जी यांनी १९८४ मध्ये कॉँग्रेसतर्फे लोकसभेची पहिल्यांदा जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बॅ. सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता. मात्र १९८९ मध्ये त्या पराभूत झाल्या. त्यामुळे १९९१ मध्ये त्यांनी दक्षिण कोलकत्तामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि विजयही मिळवला. तेव्हापासून सलग सहावेळा त्या विजयी झाल्या. मात्र, राज्यात व विधानसभा निवडणुकीत माकपशी कॉँग्रेस संघर्ष करीत नव्हता. पर्याय देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा १९९८ मध्ये स्वपक्षाशीच संघर्ष सुरू झाला. अखेरीस त्यांनी कॉँग्रेसचा त्याग केला आणि १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केली. देशात १९९८ ते २००९ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या सात निवडणुका झाल्या. डाव्या आघाडी लढताना तृणमूल कॉँग्रेसच्या पदरी पराभवच पडत होता. २००७ मध्ये डाव्या सरकारने सिंगूर आणि नंदीग्राममध्ये सेझ निर्माण करून औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार होता. त्यांच्या पाठीशी ममतांनी उभे राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही प्रकल्प रद्द करावे लागले. त्या आंदोलनात अनेक शेतकरी मारले गेले.मध्यंतरीच्या काळात ममता बॅनर्जी यांनी भाजपशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांचा समावेशही झाला. त्या आघाडीतही संघर्ष झाला. त्यांनी २०११ ची विधानसभा निवडणूक कॉँग्रेसशी आघाडी करून लढविली आणि २९४ पैकी १८४ जागा जिंकून डाव्या आघाडीचा पराभव केला. २० मे २०११ रोजी त्यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

उत्तम कवयित्री आणि चित्रकार असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. साधी सुती साडी आणि पायात स्लिपर्स घालूनच त्या वावरतात. त्यांनी आजवर काढलेल्या ३०० चित्रांपैकी काहींची विक्री झाली आणि त्यातून दहा कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. त्यांनी २०११ मध्ये ‘मा, माटी मानुष’ ही घोषणा देऊन बंगाली अस्मिता जागृत केली होती. त्यांनी ‘जागो बांगला’ वृत्तपत्रही चालविले आहे. बंगाली अस्मितेच्या आधारे एक नवी राजकीय संस्कृती त्यांनी निर्माण केली. कॉँग्रेस ते तृणमूल कॉँग्रेस, भाजप आघाडी ते कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी असा प्रवास करीत त्यांनी सर्वांशी संघर्ष केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएशी काडीमोड घेतला. आज विधानसभेत प्रचंड बहुमताने त्यांचा पक्ष सत्तेवर आहे.
लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे. तरीही पक्षाचे खरे बळ पश्चिम बंगालमध्ये आहे. आज विधानसभा आणि लोकसभेबरोबर स्थानिक संस्थांमध्ये तृणमूल कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ममता बॅनजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध करतात. भाजपने बंगालमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत एकेकाळी डाव्या आघाडीचा बालेकिल्ला तृणमूलच्या हाती गेलेला त्यांच्याच हाती सुरक्षित राहणार का? याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. त्यासाठीही आता ममतादीदींचा संघर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चालू आहे. संघर्षमय जीवनाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या हे बंगाली अस्मितेचे राजकारण आहे.उद्याच्या अंकात : उत्तरेतील बहुजन समाजाचा पक्ष

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा