शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 16:44 IST

माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे.

ठळक मुद्दे‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश  घेतला.

अकोला : वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा देत बाहेर पडले अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. बुधवारी मुंबईत सिल्व्हर ओक या बंगल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोघांनीही प्रवेश  घेतला.भारिप-बमसं आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकीनंतर मोठा धक्का बसणार हे निश्‍चित झाले होते. जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांनी ‘वंचित’मधून बाहेर पडत राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दोघांचाही प्रवेश लांबल्याने त्यांच्या प्रवेशाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्ये त्यामुळे दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीनेही या दोघांच्या प्रवेशात अडचणी निर्माण करण्यात सुरुवात केली होती. त्यामुळे कोरोना व वादळाच्या धोक्यातही अखेर बुधवारी प्रवेशाची अनिश्‍चितता संपवत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसHaridas Bhadeहरीदास भदेBaliram Siraskarबळीराम सिरस्कारSharad Pawarशरद पवारVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोला