शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Babul Supriyo: रामदेव बाबांच्या एका शब्दावर भाजपाने तिकिट दिलेले; बाबुल सुप्रियोंनी तो किस्सा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 6:36 PM

BJP MP, former minister Babul Supriyo quits politics: बाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे.

भाजपाचे माजी मंत्री आणि पश्चिम बंगालमधील मोठे नाव बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी आज राजकारणाला रामराम करत असल्याची घोषणा केली. गेल्या काही काळापासून बाबुल सुप्रियो नाराज होते. यामुळे ते मोठा निर्णय घेतील असा अंदाज बांधला जात होता. नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. पश्चिम बंगालचे असल्याने बाबुल ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येही जाण्याची शक्यता होता. परंतू बाबुल यांनी आज राजकारणच सोडण्याची घोषणा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Baba Ramdev gave Loksabha Election Ticket to singer Babul Supriyo.)

Babul Supriyo: भाजपाला मोठा धक्का! माजी मंत्री बाबुल सुप्रियोंचा राजकारणाला रामराम, खासदारकीही सोडणारबाबुल सुप्रियो यांनी आज सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राजकारण का सोडत आहे ते आडून आडून सांगितले आहे. तसेच भाजपासोबत मतभेद असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझा पक्ष भाजपाच होता आणि राहिल असे म्हणत ज्यांना समजायचेय ते समजून जातील, असे सूचक वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे बाबुल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी वगळले होते. 

मला कोणत्याही पक्षाने फोन केलेला नाही, मी कुठेही जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस किंवा सीपीआयएम, कुठेच नाही. मी नेहमी एका टीमचे समर्थन केले आहे. मी अमित शहा (Amit Shah) आणि जेपी नड्ड्ना (JP Nadda) यांना राजकारण सोडण्याचे सांगितले आहे. मी त्यांचा आभारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतू कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra modi) नाव घेतलेले नाही. 

खासदारकीचे तिकीट कसे मिळालेले...सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये बाबा रामदेव (Ramdev Baba) यांचे नाव घेतले आहे. बाबा रामदेव आणि मी एकाच विमानात होतो. तेव्हा त्यांच्याशी काही वेळ बोलणे झाले. त्यांच्या बोलण्यातून भाजपा यावेळी बंगालला गंभीरतेने घेणार आहे, असे समजले. परंतू तेवढ्या सीट येणार नाहीत. यावेळी रामदेव बाबांनी भाजपाकडे मला उमेदवार करण्यासाठी शब्द टाकला, असे ते म्हणाले. (Babul Supriyo got ticket after when they meet to baba Ramdev in Flight)

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोBaba Ramdevरामदेव बाबाBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी