शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

केरळमध्ये तापू लागले निवडणुकीचे वातावरण; पुन्हा काँग्रेस-डाव्यांमध्येच लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 6:01 AM

डाव्यांच्या या बालेकिल्ल्यात तिसरा भिडू म्हणून शिरकाव करण्यासाठी भाजपानेही जोरदार कंबर कसली

- पोपट पवारनिसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या देवभूमी केरळमध्ये लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून, आलटून-पालटून राज्यावर सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांमध्येच लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. डाव्यांच्या या बालेकिल्ल्यात तिसरा भिडू म्हणून शिरकाव करण्यास भाजपानेही जोरदार कंबर कसली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अमित शहा यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी केरळमध्ये पायधूळ झाडली आहे.केरळमध्ये १९८० पासून काँग्रेस अणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सत्ता आलटून-पालटून उपभोगली आहे. माकपने डावी लोकशाही आघाडीच्या (एलडीएफ) माध्यमातून, तर काँग्रेसने संयुक्त लोकशाही आघाडीच्या (यूडीएफ) माध्यमातून सत्तेचा राजमार्ग स्वत:कडे ठेवला आहे. सध्याच्या लोकसभेलाही या दोन्ही पक्षांनी स्थानिक छोट्या पक्षांना सोबत घेत मतांचे विभाजन टाळले होते.मात्र, २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५.९ टक्के मते घेत या दोन्ही पक्षांची भंबेरी उडविली होती. राजगोपाल यांच्या रूपाने भाजपाने विधानसभेत खातेही उघडले होते. त्यामुळे मनोबल उंचावलेल्या भाजपाने येत्या लोकसभा निवडणुकीतही या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केडरची मदत घेतली आहे. यूडीएफ व एलडीएफच्या नाराजांवरही भाजपाने गळ टाकला आहे.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही केरळमध्ये मात्र यूडीएफ अणि एलडीएफ यांच्यातच तुल्यबळ लढत झाली होती. त्यात काँग्रेसप्रणीत यूडीएफने १२ जागांवर विजयश्री मिळविली होती, तर माकपच्या एलडीएएफला ८ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाने १७ लोकसभा मतदारसंघांत तिसºया क्रमांकाची मते घेतली होती, तर तिरुवनंतपूरममध्ये भाजपा उमेदवाराने दुसºया क्रमांकाची मते घेत काँग्रेसच्या शशी थरूरयांचा घाम काढला होता.लोकसभेच्या तोंडावरच एलजेडी, इंडियन नॅशनल लीग, डेमॉक्रेटिक केरळ काँग्रेस आणि केरळ काँग्रेस (पिल्लई) हे चार प्रादेशिक पक्ष एलडीएएफमध्ये सामील झाल्याने त्यांचे बळ वाढले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडेच लोकसभेची जबाबदारी देण्याच्या तयारीत माकप आहे. तर काँग्रेसप्रणीत यूडीएफची सूत्रे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडेच राहणार असली तरी लोकसभेच्या तोंडावर केसी वेणुगोपाल यांना काँग्रेसच्या महासचिवपदावर बढती देत उमेदवारी वाटपात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे सूचित केले आहे.घरोघरी जाण्याची काँग्रेसची मोहीमकाँग्रेसने केरळमध्ये निवडणुकीची जोरदार तयारी केली असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना प्रचार कार्यक्रम ठरवून दिला आहे. पक्षाचे सचिव मुकुल वासनिक यांनी नुकतीच काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक घेत निवडणुकीसाठीचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. काँग्रेसने केरळमध्ये 'घर टू घर' मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांची माहिती गोळा करण्याबरोबर एका कार्यकर्त्याला २५ कुटुंबांमध्ये जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा