'लाव रे तो व्हिडीओ'! ...तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होता का? पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:39 PM2021-01-27T12:39:20+5:302021-01-27T13:32:25+5:30

Ashish Shelar target sharad Pawar on Farmer violence in Delhi, NCP Backfire: राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असे शेलार म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हची लिंक शेअर करत शेलारांना प्रत्यूत्तर दिले आहे. 

Ashish Shelar target sharad Pawar on Farmer violence in Delhi, NCP Backfire | 'लाव रे तो व्हिडीओ'! ...तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होता का? पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

'लाव रे तो व्हिडीओ'! ...तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपला होता का? पवारांवरील आरोपांवर राष्ट्रवादीचे चोख प्रत्यूत्तर

googlenewsNext

"पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्यात कसली आलीय देशभक्ती. हे शरद पवारांच्या देशभक्तीच्या व्याख्येत बसतं का?", असा सवाल करत भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शरद पवारांवर टीका केली होती. राजकीय सुडापोटी देशात अराजकता पसरवू नका असं म्हणतानाच शरद पवारांकडून माथी भडकविण्याचं काम अपेक्षित नाही, असे शेलार म्हणाले होते. यावर आता राष्ट्रवादीने शरद पवारांच्या फेसबुक लाईव्हची लिंक शेअर करत शेलारांना प्रत्यूत्तर दिले आहे. 


"महाराष्ट्रातले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दिल्लीतील आंदोलनाच्या हिंसेचं समर्थन करत आहेत. ज्यांनी आंदोलनात हिंसा केली त्यांच्याविरोधात चकार शब्दही काढला जात नाही. उलट महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माथेफिरुंचं समर्थन केलं गेलं. कुठे फेडणार ही पापं?", अशी टीका शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन नुकतीच केली होती. 


यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी पवार यांनी मंगळवारी केलेल्या लाईव्ह व्हिडीओची लिंक शेअर केली आहे. ''जेव्हा शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा आशिष शेलार तुम्ही झोपले होते का? असा सवाल केला आहे.  गुड मॉर्निंग आशिष शेलार, झोपेतून उठा आणि ही लिंक चेक करा.'', असे ट्विट करत शेलारांनाही यामध्ये टॅग केले आहे. 


शरद पवार काय म्हणालेले...
दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही. मात्र या घटनेमागच्या कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने बसलेले शेतकरी आज संतप्त झाले आहे. केंद्र सरकारने आपल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे निभावल्या नाहीत.  केंद्र सरकारने परिपक्वपणे आणि योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता होती, असे शरद पवार म्हणाले. आजच्या आंदोलनाला खलिस्तानशी जोडणे चुकीचे ठरेल. केंद्राने टोकाची भूमिका सोडून शेतकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.


शेतकऱ्यांना न दुखावता सरकारने सुवर्णमध्य काढणे आवश्यक आहे. बळाचा वापर करून काहीही सिद्ध होणार नाही. केंद्र सरकारने कृषी कायदे लागू करताना सविस्तर चर्चा करायला हवी होती. मात्र दिल्लीत आज घडलेल्या घटनेचे समर्थक करता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.  

Web Title: Ashish Shelar target sharad Pawar on Farmer violence in Delhi, NCP Backfire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.