शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

"ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले"

By बाळकृष्ण परब | Published: November 27, 2020 4:23 PM

Kangana Ranaut News : कंगना राणौतच्या घरावर पालिकेने केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालायाने दिलेल्या निर्णयानंतर विरोधी पक्ष असलेला भाजपा शिवसेनेविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे.

ठळक मुद्देकु-हेतू, वैयक्तिक सुडबुद्धीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्कामोर्तबच केले आहेठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले आहेआता जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी

मुंबई - कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात काही महिन्यांपूर्वी रंगलेल्या शाब्दिक युद्धानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या घरातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला होता. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना मुंबई महानगरपालिकेला दणका दिली आहे. तसेच ही कारवाई अवैध असल्याचे सांगत नुकसानभरपाई करण्यासाठी मालमत्तेचे व्हॅल्युएशन करण्याचे आदेशही उच् न्यायालयाने दिले आहे. या निर्णयानंतर विरोधी पक्ष असलेला भाजपा शिवसेनेविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. तसेच जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या घरावरील कारवाईबाबत निकाल दिल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विट करून पालिका प्रशासन आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणतात की, कु-हेतू, वैयक्तिक सुडबुद्धीचे राजकारण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने जणू शिक्कामोर्तबच केले आहे. ठाकरे सरकारने, वैयक्तिक सुडाने पेटून मुंबई महापालिकेला तोंडघशी पाडले आहे. आता कंगना रानौतला नुकसान भरपाई द्यावी लागली तर?, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

कंगनाच्या विरोधात उभ्या केलेल्या वकिलांवर खर्च झालेले पालिकेचे सुमारे 1 कोटी आणि कंगणाने दावा केलेले 2 कोटी अशी जी काही रक्कम व्हॅल्यूअर ठरवतील ती कोट्यवधीची रक्कम मुंबईकरांच्या खिशातून नको तर आदेश देणाऱ्यांनी स्वतःच्या तिजोरीतून भरावी, असा सल्लाही आशिष शेलार यांनी दिला आहे.

दरम्यान, भिनेत्री कंगना राणौतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईवर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहेत. कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केली असून ती नुकसान भरपाईस पात्र असल्याचं हायकोर्टानं पालिकेला झापलं आहे.  कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यासोबत कंगनाची वास्तू नवीन नाही, जुनीच आहे. पालिकेने केलेली कारवाई चुकीची आहे. महापालिकेने ७ आणि ९ सप्टेंबर रोजी ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.तर ''मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली आहे. मी अद्याप कोर्टाने दिलेला निकाल वाचलेला नाही. तो वाचल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल'', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतAshish Shelarआशीष शेलारUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका