शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

"30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद, एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:21 AM

Asaduddin Owaisi And Amit Shah : असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा सणसणीत टोला ओवैसींनी लगावला आहे. 

सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मतदार यादीमध्ये 30 हजार रोहिंग्यांची नोंद आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यावेळी काय करत आहेत? ते झोपा काढत आहेत का? 30 ते 40 हजार रोहिग्यांची नोंद मतदार यादीमध्ये कशी झाली याकडे लक्ष देण्याचं काम त्यांचं नाही का? भाजपाचे दावे खरे असतील तर त्यांनी संध्याकाळपर्यंत अशा एक हजार नावांची तरी यादी द्यावी" असं आव्हान ओवैसी यांनी दिलं आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी "द्वेष निर्माण करणं हाच भाजपाचा मुख्य हेतू आहे. हा वाद हैदराबाद आणि भाग्यनगरमध्ये आहे. आता कोण जिंकणार हे तुम्हीच ठरवणार आहात" असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे. याआधी लव जिहाद प्रकरणावरून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. ओवैसी यांनी लव जिहादवरून भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. "विशेष विवाह कायदा रद्द केल्यास घटनेतील कलम 14 आणि 21 चं उल्लंघन होणार आहे. त्यांनी संविधानाचा अभ्यास करायला हवा. द्वेषाचा प्रसार करणं आता काम करणार नाही. बेरोजगारीचे बळी ठरलेल्या तरुणांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा नाटक करत आहे" असं ओवैसी यांनी म्हटलं होतं. 

"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं"

भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "असदुद्दीन ओवैसी हे मोहम्मद अली जिना यांचे अवतार आहेत" असं म्हणत निशाणा साधला आहे. तेजस्वी सूर्या यांनी ओवैसींवर हल्लाबोल केला आहे. ओवैसींना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं असा घणाघात देखील केला आहे. "ही फक्त एक महानगरपालिका निवडणूक नाही, जर तुम्ही ओवैसी यांना मतं दिली तर ते महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेशांत मजबूत होतात" असं म्हटलं आहे. हैदराबादमध्ये प्रचार करताना तेजस्वी सूर्या यांनी असं म्हटलं आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शहाBJPभाजपा