शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

ममता बॅनर्जींना अजून एक धक्का, आखणी एका मोठ्या नेत्याने केला भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 1:48 PM

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाही तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये भाजपाने दिलेले आव्हान मोडीत काढून सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. (West Bengal Assembly Elections 2021 ) मात्र निवडणूक तोंडावर आली असतानाही तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. (Trinamool Congress )  आता आज अजून एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Another blow to Mamata Banerjee, Senior leader Dinesh Trivedi join the BJP)

गेल्या महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये सुवेंदू अधिकारींसारख्या मातब्बर नेत्यांचाही समावेश आहे. 

दरम्यान, तृणमूल काँग्रेसविरोधात बंडखोरी करत भाजपात दाखल झालेल्या आणि या निवडणुकीत नंदिग्राम आणि आसपासच्या भागात तृणमूलसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना थेट आव्हान देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा