शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Anil Deshmukh : त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले, आरोपांबाबत असे स्पष्टीकरण दिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 2:55 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत.

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh ) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अनिल देशमुख यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अनिल देशमुख हे कोरोनामुळे ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात उपचार घेत होते, तसेच १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होते, असा दावा पवार यांनी केला होता. मात्र पवारांचा हा दावा खोडून काढताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर आता खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  (Maharashtra Home Minister Anil Deshmukh spoke about that press conference, gave such explanation about the allegations)

त्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. 

 

दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तसेच यावेळी शरद पवार यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट झाल्याचा दावा फेटाळून लावत परमबीर सिंह यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ज्या काळात भेट झाली असा दावा करण्यात आलाय तेव्हा अनिल देशमुख हे कोरोनामुळे आधी रुग्णालयात आणि नंतर होम क्वारेंटाइन होते, असे शरद पवार म्हणाले होते. मात्र शरद पवार यांचा हा दावा देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या १५ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर करत खोडून काढला होता

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण