Amruta Fadnavis Slams Thackeray government And Uddhav Thackeray | Amruta Fadnavis :'पहचान कौन?' म्हणत अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या...

Amruta Fadnavis :'पहचान कौन?' म्हणत अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या...

मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच जनतेलाच 'पहचान कौन?' असं म्हणत एक कोड घातलं आहे. 

"ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही" अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Amruta Fadnavis : ...म्हणून अमृता फडणवीस यांना आता चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतंय; केलं 'हे' ट्विट

अमृता यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतं आहे. "मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी हे ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच  COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. 

English summary :
Amruta Fadnavis Slams Thackeray government And Uddhav Thackeray

Web Title: Amruta Fadnavis Slams Thackeray government And Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.