शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी", शिवसेनेला 'शवसेना' म्हणत अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 15:51 IST

Amruta Fadnavis And Shivsena : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत उमेदवार उभे केले होते. पहिल्यांदा बिहारमध्ये शिवसेना 50 जागांवर लढणार असल्याचं जाहीर केले. परंतु शिवसेनेने 22 जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र यातील सर्व 22 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झालं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओमध्ये बिहारमधील निवडणुकीतील कामगिरीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादीने युती केल्याचा परिणाम बिहार निवडणुकीवर झाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर गेल्यानं काँग्रेसने बिहारमध्ये व्होट बँक कमी केली. तर राष्ट्रवादीच्या आधी काही ठिकाणी जागा तरी येत होत्या आता तर ते ही झालं नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. अमृता यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा उल्लेख "शवसेना" असा केला आहे. "'शिवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारलं बिहारमध्ये, काय चाललंय तरी काय? महाराष्ट्र कुठे ही नेला असो बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबाबत धन्यवाद" असं ट्विट केलं आहे. अमृता फडणवीस यांनी बिहारमधील मतदारांचे आभार मानले आहेत. 

"शिवसेनेची संजय राऊतांमुळे महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल", निलेश राणेंचा हल्लाबोल

भाजपाने नेते निलेश राणे यांनी देखील शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडलं आहे. निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणाऱ्या शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट केला आहे. यासोबतच "वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन" असं म्हटलं आहे. बिहारमध्ये शिवसेनेची परिस्थिती जशी झाली आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. "संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील ही आम्हाला खात्री आहे" असं ट्विट केलं आहे.

"शिवसेनेचं डिपॉझिट गुल, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?"

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.  "बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिट गुल. १ टक्का मतं देखील नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कुठे आहे आपला चमत्कार?" असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्र