शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
3
Pune Crime: "दीदी, तुला या पहिल्या आणि शेवटच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा", पोलीस कर्मचाऱ्याच्या पोस्टने खळबळ
4
IndiGo Flights : 'इंडिगो'वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, याचिकेत काय आहेत प्रवाशांच्या मागण्या?
5
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
6
Shocking: महागड्या फोनवरून वडिलांसोबत वाद; १७ वर्षीय मुलाची १४० फूट खोल बोअरवेलमध्ये उडी!
7
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
8
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
9
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
10
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
11
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
12
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
13
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
14
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
15
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
17
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
18
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
19
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
20
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

'अमित शहांनी स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:58 IST

प्रकाश आंबेडकर यांची टीका

कऱ्हाड (जि. सातारा) : पाच वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात, आम्ही पाकिस्तानचे २०० सैनिक मारले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणतात की, आम्ही एकही पाकिस्तानी सैनिक मारलेला नाही. अमित शहांनी बहुतेक स्वप्नात पाकिस्तानी सैनिक मारले असतील. गेल्या पाच वर्षांत अशाच प्रकारे खोटे बोलण्याचे काम मोदींनी केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पाकिस्तानवरील हल्ल्यात किती ठार झाले? याबाबत पंतप्रधान मोदी एक तर अमित शहा दुसरीच आकडेवारी सांगत आहेत. मात्र सुषमा स्वराज सर्जिकल स्ट्राईकमध्ये एकही सैनिक न मेल्याचे खरे बोलत आहेत. अशा खोटं बोलणाऱ्या मोदींना पुन्हा सत्तेवर बसवल्यास लुटारूंचे राज्य येईल, असे त्यांनी सांगितले.
आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे प्रथम नागरिक असतात ते जे बोलतात ते प्रत्येक भारतीयाचे मत मानले जाते. मात्र पंतप्रधान मोदी व अमित शहा हे किती खोटे बोलतात याला सीमा नाहीत. खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची हीच वेळ आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना हे पक्ष जळालेल्या भाकरीच्या दोन बाजू आहेत. त्या करपल्या असून, त्यांचा आता काहीच उपयोग उरलेला नाही. या भाकरीवर पाणी मारण्याची हीच वेळ आहे.नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेलपुणे : शरद पवारांनी मला घाबरुनच माढ्यातून माघार घेतली. मावळात नातवाला उभे केले. नातवाचे गुण सांगितले तर पवारांना ‘शॉक’ बसेल. या शॉकमध्ये त्यांना काही झाले तर दोष माझ्यावरच यायचा, असे सांगत आंबेडकर यांनी पवारांची घराणेशाही आणि मक्तेदारी संपवण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यांचे कार्यकर्ते अभिनंदनाचे फोन करीत असून विधानसभेच्या तिकीटांबाबत आतापासूनच विचारणा होऊ लागली आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. राज्यात काँग्रेस तिसºया स्थानावर जाणार असून खरी लढाई भाजप आणि वंचित आघाडीमध्येच होणार आहे. आम्ही काँग्रेसशी भांडू, दोन हात करु पण भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019satara-pcसाताराAmit Shahअमित शहाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर