शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अजित पवार, तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच, आता शब्द फिरवू नका :खासदार आढळराव पाटील यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 8:55 PM

लोकसभेची निवडणूक अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच. आता तुम्ही शब्द फिरवून मागे पळू नका,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले. 

 खेड : ‘‘लोकसभेची निवडणूक अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लढाच. आता तुम्ही शब्द फिरवून मागे पळू नका,’’ असे आव्हान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांना दिले.               पवार साहेबांनी सांगितल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास मी शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढेन. इतकेच काय, निवडूनही येईन, अन्यथा पवारांची औलाद सांगणार नाही,’ असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर येथील एका कार्यक्रमात रविवारी केले होते. या वक्तव्याचा समाचार घेत आढळराव पाटील यांनी अजित पवारांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्याचे आव्हान दिले.               पाटील म्हणाले, अजित पवारांच्या पक्षाला आजवर माझ्याविरोधात लढायला सक्षम उमेदवार मिळाला नाही. लिंबू टिंबू उमेदवार उभे केले. अजित पवार हे मोठे नेते नाहीत. त्यांना माझ्याविरुद्ध लढायची खुमखुमी आली आहे. अजित पवारांना आपले खुले आव्हान आहे. अरे ओबामा जरी आले तरी मला फरक पडणार नाही. माझ्याविरोधात लढल्यास तुमचे स्वागत आहेच, मात्र, आता तुम्ही याचे त्याचे नाव पुढे करून रंणागणातून पळ काढू नका. पवारसाहेबांना विचारून तुम्ही सर्व गोष्टी करीत नाहीत आणि पक्षश्रेष्ठी तुम्हीच असल्याने तुम्हास आदेशाची गरज नाही. त्यामुळे अजित पवार तुम्ही माझ्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढून दाखवा आणि शब्द पाळा, असेही आढळराव पाटील म्हणाले. आम्हीही लढणाऱ्यांचीच औलाद         शिवजन्मभूमितील मी रांगडा मावळा सैनिक आहे. आम्हीसुद्धा लढवय्ये आहोत. छत्रपतींचा इतिहास यास साक्षी आहे. स्वत:च्या मनगटात जोर आहे. दुसऱ्यांच्या ताकदीवर बढाया मारणाऱ्यांची नव्हे, तर लढणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे मी मतदारसंघात काम करतोय. इथल्या मतदारांशी माझी नाळ घट्ट आहे. जनतेचे आपल्यावर प्रेम आहे, कारण त्यांना मी त्यांच्या घरातील व्यक्ती आणि खासदार वाटतो. मी केलेली विकासकामे आणि जनतेचे प्रेम ही माझी ताकद आहे. या ताकदीवर मी कोणाविरुद्धही लढायला तयार आहे. खरे तर आम्ही सुसंस्कृत राजकारणाची कास धरतो आणि जशास तसे उत्तर देण्याची क्षमताही आम्ही ठेवतो, हेही तुम्ही लक्षात घ्या, असे आव्हान आढळराव पाटील यांनी दिले. इतिहासाची पाने चाळा, अजित पवार, दिलीपराव वळसे पाटील, स्व. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, स्वत: शरद पवार अशा स्टार कास्टने माझ्याविरुद्ध मतदारसंघात जंग जंग पछाडून मला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारांनी त्यांचे ऐकले नाही. पवारसाहेबांनीही येथून लढण्यासाठी चाचपणी केली होती, हाही इतिहास अजित पवार विसरले असतील तर त्यांचे दुर्दैव आहे. इतिहासाची पाने जरा अजित पवारांनी चाळावीत म्हणजे त्यांना माझाही अंदाज येईल.   

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना