शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Ajit Pawar: अजित पवार, हसन मुश्रीफांची जबाबदारी वाढली; दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रीपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 19:58 IST

Dilip Walse Patil new Home minister Of Maharashtra: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राजीनामा दिल्याने सांयकाळी नव्या गृहमंत्र्यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackreay) दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्याकडे देण्यात यावा असे म्हटले आहे. यामुळे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. (Dilip Walse Patil's Labour department charge is being given to Hasan Mushrif as additional charge and state Excise Department will be looked after by Deputy CM Ajit Pawar: Maharashtra CMO)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना इकडे राज्याचे नवे गृहमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. या पत्रात दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा; तसेच कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात यावा अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत होती. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर होती. त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत होते.

उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख दिल्लीला गेले आहेत. अशातच शिवसेनेचे मंत्री आणि मातोश्रीचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. शरद पवारांचा संदेश त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहोचविला होता. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलAnil Deshmukhअनिल देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरे