राज्यात राजकीय भूकंप? हीच ती वेळ! महाराष्ट्रात "भगव्या"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 03:55 PM2021-06-20T15:55:09+5:302021-06-20T15:59:14+5:30

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची दिल्लीत अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली.

After Shivsena Pratap Sarnaik Letter BJP Nitesh Rane hints over government will form coming soon | राज्यात राजकीय भूकंप? हीच ती वेळ! महाराष्ट्रात "भगव्या"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत

राज्यात राजकीय भूकंप? हीच ती वेळ! महाराष्ट्रात "भगव्या"च राज्य येते आहे; भाजपा आमदाराचे संकेत

Next
ठळक मुद्देआमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करा अशी मागणी करणारं पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये फोनवरूनही चर्चा झाल्याची माहिती आगामी काळात राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याचं संकेत

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत सर्वकाही ठीक असल्याचं दिसून येत नाही. एकीकडे महाविकास आघाडीतला मित्रपक्ष काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढवू अशी भूमिका मांडत आहे. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादी आम्ही एकत्रित निवडणुका लढवू असं म्हणत काँग्रेसला सूचक इशारा देत आहेत. यातच अलीकडेच शिवसेना-भाजपा(Shivsena BJP) पुन्हा एकत्र येतील अशीही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांची दिल्लीत अर्धा तास बंददाराआड चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना-भाजपा एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यातच आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबत युती करा अशी मागणी करणारं पत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर या पत्रानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रात भगव्याचं राज्य येते आहे. हीच ती वेळ असं म्हणत एकप्रकारे राज्यातील राजकारणात आगामी काळात राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं. आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. काही चुकले असल्यास दिलगिरी असं प्रताप सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

त्याचसोबत तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत असा गंभीर आरोपही प्रताप सरनाईक यांनी पत्रातून केला आहे.

शिवसेना-भाजपात चाललंय तरी काय?

दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिल्लीतील उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील, त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, अशी चर्चा मोदी-ठाकरेंमध्ये झाल्याचं कळतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३० जागा लढवेल आणि शिवसेनेला १८ जागा दिल्या जातील, तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचं समसमान वाटप होईल आणि जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, इथपर्यंत या दोन नेत्यांचं बोलणं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय नेतृत्वावर टीका करणं टाळलं

शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या केंद्रीय पातळीवरील नेत्यांबाबतही थेट टार्गेट करणं टाळलं आहे. राम मंदिराच्या जमीन खरेदीत जे आरोप होत आहेत. त्यावर काही बोलले नाही. कारण त्यावर बोलणं म्हणजे संघाची नाराजी ओढावून घेणे हे त्यांनी केले नाही. भविष्यात शिवसेनेला पर्याय हवा असेल तर राष्ट्रीय नेतृत्वाची नाराजी उद्धव ठाकरेंना घ्यायची नाही. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य टाळलं आहे. लसीकरण धोरणांवर काही बोलले नाही असं राजकीय विश्लेषक संदीप प्रधान म्हणाले आहेत.

Web Title: After Shivsena Pratap Sarnaik Letter BJP Nitesh Rane hints over government will form coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.