पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ; काँग्रेसचा मोठा विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:13 IST2021-02-25T20:12:20+5:302021-02-25T20:13:35+5:30
PM Narendra Modi Constituency: वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठ विद्यार्थी संघटना निवडणुकीत काँग्रेसच्या एनएसयुआयने मोठा विजय मिळविला आहे. या निवडणुकीत कांग्रेसचे NSUI आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनांनी बनविलेल्या पॅनलला मोठे यश मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात ABVP चा सुपडा साफ; काँग्रेसचा मोठा विजय
गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये मोठे यश संपादित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का देणारी बातमी आहे. नरेंद्र मोदींच्यावाराणसी लोकसभा मतदारसंघात ABVP ला सपाटून हार पत्करावी लागली आहे. (ABVP lost Election in PM Narendra Modi Constituency. )
वाराणसीच्या महात्मा गांधी काशी विद्यापीठ विद्यार्थी संघटना निवडणुकीत काँग्रेसच्या एनएसयुआयने मोठा विजय मिळविला आहे. या निवडणुकीत कांग्रेसचे NSUI आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनांनी बनविलेल्या पॅनलला मोठे यश मिळाले आहे.
एनएसयुआयने या निवडणुकीत उपाध्यक्ष, महामंत्री सह सहा प्रतिनिधी पदांवर विजय मिळविला आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठामध्ये एकूण 8 जागा होत्या, यापैकी 6 जागा जिंकून एनएसयुआयने आभाविपला जोरदार धक्का दिला आहे. NSUI चे संदीप पाल हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पांडेय महामंत्री बनले आहेत. तर सपाचे विमलेश यादव अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दुसरीकडे लायब्ररी मंत्री म्हणून आशिष गोस्वामी हा अपक्ष म्हणून निवडून आला आहे.