Pune | क्रिकेट मॅचमध्ये झालेल्या वादातून तरुणाला स्टॅम्प, बॅटने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 18:53 IST2023-01-09T18:51:36+5:302023-01-09T18:53:39+5:30

मॅचमध्ये झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एकाला स्टॅम्प आणि बॅटने मारहाण करून जखमी केले...

youth was beaten with a stamp and a bat due to an argument in a cricket match | Pune | क्रिकेट मॅचमध्ये झालेल्या वादातून तरुणाला स्टॅम्प, बॅटने मारहाण

Pune | क्रिकेट मॅचमध्ये झालेल्या वादातून तरुणाला स्टॅम्प, बॅटने मारहाण

पिंपरी : दोन संघात सुरू असलेल्या क्रिक्रेट मॅचमध्ये झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एकाला स्टॅम्प आणि बॅटने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. ८) पुसाने, मावळ येथे घडली. याप्रकरणी भरत किसन वाटाणे (वय २६. रा. ओवळे, मावळ) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शशिकांत साठे, सागर साठे, शेखर साठे, लखन साठे, तेजस तावरे, राजू साठे (सर्व रा. ओवळे, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळे गावची प्रिमियर लिग स्पर्धेत प्रतापगड वॉरियर्स व राजगड वॉरियर्स यांची मॅचमध्ये फिर्यादी आणि आरोपी शशिकांत यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचा राग मनात धरून आरोपी यांनी फिर्यादी यांना स्टॅम्प आणि बॅटने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून आरोपी राजू साठे याने इतर आरोपींना स्टॅम्प पुरविले असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: youth was beaten with a stamp and a bat due to an argument in a cricket match